सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यातील नाझरे येथे पती सतत दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे पत्नीने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. हत्येनंतर नंतर पतीचा मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. याबाबत सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाझरे येथे आकाश शिंदे हा पत्नीसह दोन मुलांसोबत राहतो. आकाश चव्हाण भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र सतत दारु पिऊन पत्नीला मारझोड करत असतो. त्यामुळे घरात सतत वाद होत असत. त्यातूनच दहा ते बारा दिवसापूर्वी आकाश व त्याची पत्नी कसाबाई आकाश शिंदे याचे कडाक्याचे भांडण झाले. आकाश पिला असल्यामुळे पत्नीने दोन अल्पवयीन मुलांसह आकाशला काठीने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचा त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह राहत असलेल्या पालाच्या घरात खड्डा खोदून गाढला.
आकाशाच्या अल्पवयीन पुतण्याच्या सांगण्यावरून खुनाचा शोध लागला. सांगोला पोलीस स्टेशनमध्ये बाबासाहेब पुंडलिक शिंदे यांनी कासाबाई शिंदे व दोन अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास राजेश गवळी करत आहे.
0 Comments