कामावरून उशिरा घरी आलेल्या पतीचे कोणत्या तरी कारणावरून पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर झोपी गेलेल्या पतीच्या चेहऱ्यावर त्यांच्या पत्नीनं चक्क उकळते तेल ओतले.
त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी शिवकुमारी अहिरवार हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शिवकुमारी आणि पती अरविंद अहिरवार या दोघांचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले आहे.अरविंद अहिरवार हा रोजंदारीचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो कामावरून उशिरा घरी आला.
त्यानंतर कोणत्या तरी क्षुल्लक कारणावरून त्याचा पत्नीशी वाद झाला. रात्री तो झोपला. झोपेत असताना पत्नी शिवकुमारी हिने त्याच्या चेहऱ्यावर उकळते तेल ओतले. यात तो होरपळला आहे. त्याला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
0 Comments