“ओबीसींच्या महाज्योतीला पैसे देताना हात थरथरतात का?"


महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केला आहे.

महाज्योती संस्थेला ५०० कोटी रुपयांचा निधी मिळावा, या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपुरमध्ये पत्रकार परिषद घेतली. अजित पवार एका दिवसात सार्थी संस्थेला निधी देतात. मग महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?. या सरकारने जाणीवपूर्वक महाज्योतीला निधी दिला नाही, असं पडळकरांनी म्हटलंय.

महाज्योती संस्थेला फडणवीस सरकारने ३२० कोटी रुपये दिले होते. पण सध्याच्या राज्य सरकारकडून महाज्योती संस्थेकडे दुर्लक्ष केलं जातंय.  ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

Post a Comment

0 Comments