किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी केरळच्या बीचवर हॉट मॉडेल्सचे ग्लॅमरस फोटोशूट


अनेकजण आवर्जुन हॉट आणि मादक सौंदर्यवती मॉडेल्स पाहण्यासाठी किंगफिशरच्या कॅलेंडरची वाट पाहतात. वाट पाहण्याचा काळ आता संपलेला आहे.
 किंगफिशर कॅलेंडर २०२१ लवकरच आकर्षक मॉडेल्ससोबत आपण भेटीस येत आहे. 
सध्या सर्वत्र या कॅलेंडरमध्ये झळकणाऱ्या मॉडेल्सची चर्चा होत आहे. 

केरळमध्ये यंदाचे किंगफिशर दिनदर्शिका २०२१ साठी फोटो शूट करण्यात आले आहे. 
हिरवाईने नटलेला निसर्ग, गगनचुंबी नारळाच्या बागा, शांत सुंदर सागरी किनाऱ्यावर आकर्षक आणि अत्यंत मादक अशा ललनांचे फोट शूट करण्यात आले आहे. 
या फोटोंसह तुम्हाला केरळच्या निसर्गाची सफर ही दिनदर्शिका घडवते. दरवर्षीच्या किंगफिशरच्या कॅलेंडर प्रमाणे यंदा नव्या कोऱ्या आणि आकर्षक सौदर्यंवती मॉडेल्सना या कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आले आहे. 
यंदाच्या मॉडेल्सही नेहमीच्या तुलनेत काही अधिकच तुम्हाला आकर्षिक करुन घेतात.

 यंदा पाच मॉडेल्सना या कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आले आहे.
 त्यामध्ये गेहना माहिरीया, क्रितिका बाबू, अनुकिर्ती वास, ॲडलीन कॅस्टीलिनो आणि सुमिता भंडारी यांच्या मोहक आणि दिलखेचक अदांना कॅमेराबद्ध करण्यात आले आहे. 
केरळच्या अतभूत आणि नयनरम्य वातावरणात या मादक ललनांना पाहणे म्हणजे किंगफिशरने दिलेली ही अनोखी मेजवाणीच आहे. 
कॅलेंडरच्या फोटो शूटसाठी आलिया अल रुफायी यांनी स्टाईलचे काम पाहिले आहे. 
मनिषा फाल्कीना यांनी वेषभूषा आणि फ्लावीन हेल्डेट यांनी केशभूषाची जबाबदारी सांभाळली आहे. यासह या सर्व सौदर्यांचा आपल्या कॅमेरात अतुल कसबेकर यांनी कैद केले आहे. 

Post a Comment

0 Comments