ब्रेकिंग! धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा, तुर्तास राजीनामा नाही!



बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही.

धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्याची रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार

धनंजय मुंडे यांचे मेव्हणे  पुरुषोत्तम केंद्रे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार नोव्हेंबरमध्य तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. ब्लॅकमेलिंक करणे, त्रास देणे अशा प्रकारचा त्रास रेणू शर्मा यांच्याकडून दिला जात होता, असं केंद्रे यांनी अपल्या तक्रारीत म्हटल आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्याआधी भाजपने आधी स्व:तकडे बघावं : सुनील केदार

“धनजंय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने स्व:तकडे बघावं. भाजप आमदार राम कदम यांनी केलेलं वक्तव्यही त्यांनी बघावं,” असा टोला पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी भाजपला लगावला. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडेंवरच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही : किरीट सोमय्या

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंड यांचा राजीनामा तूर्तास न घेण्याची भूमिका घेतल्यामुळे विरोधकांकडून टीका होतेय. “सगळं शरद पवार यांचं नाटक आहे. रेणू शर्मा यांच्यावर कोणतेही आरोप होऊ देत. पण त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होतेय : जयंत पाटील

“ज्या महिलने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन या महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही कारवाई करु,”  असे जयंत पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments