बार्शी बायपास रोडवर भीषण अपघात

बार्शी/प्रतिनिधी:

मिळालेल्या माहितीनुसार, बुलेरो गाडी व छोटा टेम्पो यांच्यात अपघात झाला. अलीपुर ते परंडा चौक रोड बार्शी बायपास रोडवर भीषण अपघात झालेला आहे हा अपघात एक ते दोनच्या दरम्यान झालेला आहे.

 धडकेमध्ये दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून प्रवासी यांना थोडीशी दुखापत झालेली आहे याबाबत बार्शी शहरातील स्थानिक नागरिक व तेथे जमलेले नागरिक यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन बार्शी व १०८ अंबुलान्स यावर संपर्क करून त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.  तेथील ट्रॅफिक सुरळीत रित्या सोडण्यात आले.

Post a Comment

0 Comments