कोल्हापूर/प्रतिनिधी:
आयुष्यात रत्नासारखी कामगिरी व कमी वयात हटके कामगिरी करून दाखवल्याबद्दल श्रेयश पाटील यांना सर्च मराठी फौंडेशन आणि मीडिया ग्रुप कडून राज्यस्तरीय "आदर्श युवा पुरस्कार" देऊन सन्मानित कऱण्यात आले.
सदरच्या या सर्च मराठी फौंडेशन आणि मीडिया ग्रुप या तर्फे आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय "आदर्श युवा पुरस्कार" या वितरण सोहळ्यप्रसंगी प्रमुख अतिथी पोलीस उप-अधीक्षक स्वाती गायकवाड- साळुंखे, ओंकार नावलेहालकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महाराष्ट्र राज्य, दत्तात्रय पाटील, संचालक, विश्वास ग्रुप, आमदार ऋतुराज पाटील, या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी ओंकार नावलेहालकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी आम्ही कसे घडलो व पोलीस उप-अधीक्षक स्वाती गायकवाड- साळुंखे यांनी युवकांना प्रेरणादायी वक्तव्य केले. हा पुरस्कार सोहळा शनिवारी दि. २/१/२०२१ रोजी कोल्हापूर इंगग्नेअरिंग असोसिएशन हॉल येथे पार पडला.
0 Comments