भूम/प्रतिनिधी:
केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये थ्री एस अकॅडमीच्या भूमच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवले आहे. थ्री एस अकॅडमी स्थापना १५ जानेवारी, २०१२ ला झाली. नवव्या वर्धापन दिनाचे औचित्य व स्टाफ सिलेक्शन च्या ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार थ्री एस अकॅडमीच्या वतीने करण्यात आला.
गेल्या नऊ वर्षांपासून थ्री एस अकॅडमी वाढवण्यासाठी आतोनात श्रम करणारे प्रा. सोमनाथ देवकर यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रा. देवकर यांचे प्रामाणिक प्रयत्न व विद्यार्थ्यांनी केलेले मेहनत यामुळे थ्री एस अकॅडमी ने मराठवाड्यात लौकिक मिळवला आहे, हि अकॅडमी मराठवाड्यात सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी म्हणून ओळखली जाते. अकॅडमी चा वर्धापन दिन आणि ४३ विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारने घेतले गेलेल्या स्टाफ सिलेक्शन च्या परीक्षेत यश हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
थ्री एस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार द्वारे घेतल्या गेलेल्या स्टाफ सिलेक्शन परीक्षेत ४३ विध्यार्थी घवघवीत यश मिळवले. यामध्ये गोविंद देवकर, किसन उगले, संजय गिलबिले, प्रेमराज शेळके, विजय लावंड, शिवदास कोकाटे, कुंडलिक घुले, शंकर चोरमले, रोहित देवरे, ज्ञानेश्वर डोके, ज्ञानेश्वर गुंजाळ, सत्यवान गायकवाड, तुषार पालखे, शुभम चाकोते, सुधीर सुर्वे, गोविंद वाकडे, कुंडलिक घुले, सोनम पठाण, अंजली कावळे, नानासाहेब कावळे, महेश भारती, अक्षय पोटे, घनश्याम सांगळे, समाधान गायकवाड, तुषार भालके विनायक कुटे, आकाश मोहिते, शुभम जावळे, दीपक नाईकनवरे, अक्षय तिकटे, ऋषिकेश कांबळे, तुकाराम लवटे, सागर चोरमले, रेवन कांबळे, नाना कांबळे, महेश भारती या यशाबद्दल थ्री एस अकॅडमीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यानिमित्त शिवचरित्रकार बापूसाहेब शेळके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील शिवाजी व्हावे, असे प्रतिपादन बापूसाहेब शेळके यांनी बोलताना केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय हनुमान ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे, एपीआय आशिष खांडेकर, एपीआय धरमिंदर, कोळेकर, एपीआय मंगेश साळवे, एपीआय बाळराजे दराडे, शिवनेरी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, थ्री एस अकॅडमीचे मेजर बाळकृष्ण कोळेकर, मेजर तुकाराम गडदे, मेजर अमोल धायगुडे, थ्री एस अकॅडमीचे प्रा. पांडुरंग कोकणे प्रा. मांगले सर, राज करिअर अकॅडमीचे सुजित देशमुख शिक्षणमहर्षी बिरमल तरंगे, रत्नापूर चा नवनियुक्त सरपंच गवळण ताई देवकर उपसरपंच दत्ता देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. राजवन यांनी केले.
0 Comments