सांगोला/प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अक्षय विभूते यांच्या प्रचारासाठी मुंबई, जळगाव,पंढरपूर, सांगोला येथील अनेक मान्यवर लोटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी आले आहेत.त्यांनी प्रभाग क्रमांक ४ मध्ये रॅली व काॅर्नर सभा घेऊन राजकीय धुराळा उडवला.
काॅर्नर सभेमध्ये जळगाव मनविसे जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. ते बोलताना असे म्हणाले, लोटेवाडी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक.४ मधील उमेदवार अक्षय विभूते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष आहेत.
त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलन केली, व सरकारी दरबारी प्रश्न मांडून त्यांनी यशस्वीपणे मार्गही लावली लोटेवाडी मध्ये अनेक प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले, असे चेतन पाटील यांनी सांगितले.
सभेमध्ये लोटेवाडी ग्रामपंचायतचे उमेदवार अक्षय विभूते सभेमध्ये बोलताना म्हणाले की, लोटेवाडी प्रभाग क्रमांक.४ मधून मी अर्ज भरलेला आहे व मी उभारायचे कारणं म्हणजे आजपर्यंत जो प्रभाग क्रमांक ४ मध्ये विकास झाला तो अंत्यत अपूरा आहे. त्यामुळे मी असा निर्णय घेतला कि प्रभाग क्रमांक ४ मध्ये जो विकास करायचा आहे त्यांची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली पाहिजे असा विकास करणार आहे. प्रभाग क्रमांक.४ मधून उभा आहे व ४ नंबर माझे कपबशी चिन्ह आहे त्या समोर बटन दाबून तुम्ही मला विजयी करायचे आहे. मी विजयी होणार याची मला खात्री आहे.
यावेळी एम एन एस ९ एस एम एस टीम संस्थापक सचिनभाऊ तळेकर, वर्सोवा विधानसभा उपविभाग अध्यक्ष तसेच केतन नाईक, कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली एम एन एस टीम ९एस एम एस चे अध्यक्ष गजानन लाड, जळगांव चे सहकारी चेतन पाटील, मुंबईतील महाराष्ट्र सैनिक सुधीर लाड व निजामुद्दीन शेख, पंढरपूर चे महाराष्ट्र सैनिक सागर बडवे माळशिरस तालुका प्रसिद्धी प्रमुख फिरोज शेख एम एन एस, ओंकार शिंदे मनविसे तालुका उपाध्यक्ष सांगोला सांगोला तालुका उपाध्यक्ष कृष्णदेव इंगोले एखतपुर विभागाध्यक्ष खंडू भाऊ इंगोले पिलीव शहराध्यक्ष अनंत राजपुत कट्टर मनसे सैनिक व लोटेवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments