कोल्हापूर/प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिकेचे छत्र उपलब्ध व्हावे. या उद्देशाने सुनिल दळवी या तरुणांने शिवाजी विद्यापीठातील मित्रांच्या मदतीने राजर्षी शाहूं महाराजांच्या कार्याने प्रेरित हाेऊन शैक्षणिक कार्यात शाहूमहाराजांचे विचार जागृत राहण्यासाठी सायबर चौक परिसरात 'लाेकराजा' स्टडी सेंटर सुरु केले आहे.राधानगरी-भुदरगड मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते फित कापुन अभ्यासिकेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी आमदार प्रकाश आबिकर म्हणाले,प्रसन्न वातावरणात सर्व साेयी सुविधायुक्त स्टडी सेंटर मुळे अनेक अधिकारी या स्टडी सेंटर मधून घडतील. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू.तसेच सुनिल दळवी यांना या कार्यासाठी त्यांनी सदिच्छा दिल्या.
तत्पुर्वी कपिल शेंडगे (सहा.लेखाधिकारी, अर्थमंत्रालय भारत सरकार) यांनी अशा साेयीसुविधायुक्त स्टडी सेंटर जर काेल्हापुरमध्ये तयार हाेत असतील तर नक्कीच स्पर्धा परीक्षा निकालामध्ये देखील त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येईल असे मत विशद केले. विवेक कुलकर्णी (उपवनसंरक्षक सहा.) यांनी आपल्या मनाेगतामध्ये सांगितले की, तुम्ही अधिकारी झालात तरी ग्रामीण भागाविषयी तुमची नाळ पुर्वीप्रमाणे जाेडलेली असायला हवी अथवा त्या पदाला आपण न्याय दिला असं म्हणता येणार नाही.
तसेच रावण समुद्रे (विशेष कार्य.अधि.महाराष्ट्र शासन) यांनी सुनिल दळवी(MSRTC - Clerk, उल्लेखनीय सामाजिक.कार्याबद्दल मा. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त) यांच्या सामाजिक कारकीर्दीचा आलेख सर्वांसमाेर मांडून अशा शाहूंची विचारधारा जपणाऱ्या कृतीशील युवकांची आज समाजाला गरज आहे असल्याची भावना व्यक्त केली. त्याचबराेबर विनायक रेडेकर, राजेश पाटील, उमेश सुतार यांची देखील मनोगते यावेळी पार पडली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.तेजस पाटील यांनी केले तर आभार सुनिल दळवी यांनी मानले.
यावेळी सुभाषराव पाटील (मा.उपमहापौर)श्री.अरविंद पाटिल (शाखाधिकारी, प्राथ. शिक्षक बँंक), श्री.बंडाेपंत दळवी (मा.सरपंच),श्री. संजय काटकर (सामाजिक कार्यकर्ते),प्रा.दिपाली धावणे,दै.सकाळचे पत्रकार मतीन शेख,अश्वमेध मिडियाचे संचालक सुशांत उपाध्ये,राष्ट्रीय कुस्तीपट्टू प्रदिप तानुगडे,सहयोग फौंडेशनचे सुशांत माळवी,अनुप पाटील (रोटरी क्लब),दयानंद निकाले,रणजित चौगुले,अमोल कांबळे,शेखर लोंढे,तानाजी गडदे यांच्यासह शिवाजी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी वर्ग माेठ्या संख्येने उपस्थित हाेता.
0 Comments