एका खाजगी बस मध्ये किन्नरकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत्या बसमध्ये चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी एक तरुणी गोंदियाहून पुण्याकडे येण्यास खाजगी बसमध्ये चढली होती. किन्नरने तिला मागील सीटवर बसवून तिचा प्रथम विनयभंग केला.
त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तरुणीने पुणे येथे पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी सदर तक्रार गोंदिया पोलिसांकडे दिली. पोलिस प्रकरणाचा तपास करत असून आरोपी अद्याप फरार आहे.
0 Comments