औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. मात्र सत्तेत असलेल्या काँग्रेसने आपला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेना औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा असं म्हणत आहे. म्हणजे त्यांचे मतदार खुश होतील असं त्यांना वाटत आहे. काँग्रेस याला विरोध करत आहे म्हणजे त्यांचे मतदार खुश होतील, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला. दरम्यान, औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता असूनही कुठलंही महत्त्वाचं काम न करता आल्यानं आता नामांतराची भाषा सुरू झाली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
0 Comments