सोनमने तिचा पती आनंद आहुजा किस करताचा फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. विशेष म्हणजे सोनमने यापूर्वी कधीच असा फोटो शेअर केला नव्हता. मात्र किस करतानाचा फोटो शेअर करत तिने सा-यांचेच लक्ष खेचून घेतलं आहे.
सोनमने आपला २०२१ मधील संकल्प सांगत आपल्या पतीसोबतच फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सध्या सोनम कपूर स्कॉटलंडला असून ग्लासगो येथे क्राइम थ्रिलर ‘ब्लाइंड’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात येणार आहे. जो सीरियल किलरचा शोध घेत असतो. यामध्ये विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे दिसणार आहेत.
0 Comments