प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने सामाजिक व अन्य जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करण्यात येते .हे कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी हे महाविद्यालय नेहमीच कटिबद्ध असून त्याचाच एक भाग म्हणून "माझी वसुंधरा" अभियानांतर्गत आज १ जानेवारी २०२१ रोजी हरित शपथग्रहण कार्यक्रम संपन्न झाला.
राज्य शासनाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत 'माझी वसुंधरा अभियानाची'अंमलबजावणी व वसुंधरेच्या प्रति एक हरित जबाबदारी म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने करावा या हेतूने राज्य पातळीवर हरित शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जयसिंगपूर कॉलेजच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी व अन्य वर्गाचे विद्यार्थी यांना एकत्रित करून कोरोना संबंधित सर्व प्रोटोकॉल विचारात घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. महावीर बुरसे यांनी केले.सदर कार्यक्रमांमध्ये सुरुवातीस नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी सर्व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी हरित शपथ ग्रहण करून पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने जे काही सकारात्मक प्रयोग व प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करता येईल असे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. तर कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक श्री.संजीव मगदूम, बाहुबली भनाजे यांचे सहकार्य लाभले. प्रा शीतल पाटील यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.
1 Comments
Nice
ReplyDelete