इंडोनेशियामध्ये आज दि.१५ रोजी भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी होती.या भूकंपात एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मामुजू शहरामध्ये ही दूर्घटना घडली असून इमारतीच्या ढीगाऱ्याखाली रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अडकले आहेत.
सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली असून भूकंपामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, या भूकंपामध्ये रुग्णालय कोसळले असायची माहिती बचाव कार्याच्या पथकातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली नेमके किती रुग्ण आणि कर्मचारी अडकली याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.
0 Comments