ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार



प्रताप सरनाईक यांच्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

 संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरू आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सुञांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ५ जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. ५ जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार आहे, अशी माहिती मिळते आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेने आता ईडीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर येते आहे.


Post a Comment

0 Comments