सोलापूर/प्रतिनिधी:
दिनांक ०१/१०/२०२० रोजी विजयपूर येथे राहणारे फिर्यादी यांना मल्लेश नावाचे इसमाने कमी
पैश्यामध्ये सोने विकत देतो असे सांगून विजयपूर येथून मंद्रूप पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंत्रोळी गावचे शिवारात बोलावले होते.त्यावरून फिर्यादी व त्याचे इतर तीन साथीदार हे डिझायर कारमधून सोने घेण्यासाठी आले होते. तेथे आल्यानंतर मल्लेश हा त्याचे इतर आठ ते नऊ साथीदारांसह तेथे येवून फिर्यादी व त्याचे साथीदरारांना
तलवार व लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांचेकडील ११,१००/- रूपये रोख रक्कम व तीन मोबाईल जबरदस्तीने चोरून घेवून गेले होते. सदरबाबत मंद्रुप पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३०१/२०२०, भा.द.वि.क. ३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर असल्याने गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत मा.तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यावरून दि.१५/०१/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडून सदरचा गुन्हयातील एक आरोपी हा मिरी,ता.मोहोळ येथील राहणारा असून तो बेगमपूर येथील बाजारात मच्छी विकत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. सदर बातमीवरून सपोनि मांजरे व पथकाने बेगमपूर येथून सदर इसमास ताब्यात घेतले.त्याच्याकडे मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्हयाबाबत तपास करता त्याने तो त्याचे इतर साथीदारांसह केल्याची कबूली देवून आणखी
आरोपीच्या ठावठिकाणाची माहिती दिली होती. त्यावरून सदर आरोपीचा शोध घेवून त्यातील आणखी एका आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश मिळाले आहे. त्यांचेकडे अधिक तपास करून गुन्हयातील जबरीने घेवून गेलेले तिन्ही मोबाईल अटक आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदरच्या दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी मंद्रुप पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा.अपर पोलीस
अधीक्षक श्री.अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सर्जेराव पाटील याचे
नेतृत्वाखाली सपोनि रविंद्र मांजरे, सहा.पो.उपनिरीक्षक ख्याजा मुजावर, पोह नारायण गोलेकर, पोह धनाजी
गाडे, पोह मोहन मनसावाले, पोकॉ धनराज गायकवाड, पोकॉ अक्षय दळवी व चापोकॉ समीर शेख यांनी
बजावली आहे. तसेच करकंब पोलीस स्टेशनकडील गुरनं ४०५/२०२०, भा.द.वि.क.३७९ मधील आरोपीस अटक करण्यात आलेली असून त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा मोबाईल व आरोपीस करकंब पोलीस स्टेशनकडे देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे अकलूज पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुरनं ५००/२०२० भा.द.वि.क.४५७,३८० मधील चोरीस गेलेला व्हीओ कंपनीचा वाय ९३ मॉडेलाचा मोबाईल हा विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे मिळून आल्याने सदरचा मोबाईल व विधीसंघर्षग्रस्त बालकाचा ताबा अकलूज पोलीस स्टेशनकडे देण्यात आलेल आहे.? अकलूज व करकंब पोलीस स्टेशनकडील कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,
मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील याचे नेतृत्वाखाली पोहवा राजेश गायकवाड, पोह विजय भरले, पोना रखी माने, पोना हरी पांढरे, पोकॉसचिन गायकवाड यांनी बजावली आहे.
0 Comments