पंढरपूर/प्रतिनिधी:

भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांवर पंढरपूर पोलिसांनी कारवाई केली होती. आता त्या 36 गाढवांची रवानगी चक्क थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या उटी येथील इंडिय प्रोजेक्ट फॉर अनिमल अँड  नेचर संस्थेच्या कोंढवाड्यात पाठवण्यात आले.

वाळू माफियांकडून गुन्हे टाळण्यासाठी गाढवांचा वापर

पंढरपूर शहर व तालुक्यात भीमा नदीकाठी अहोरात्र वाळू उपसा करणार्‍या माफियांनी थैमान घातले आहे. त्यातच पोलीस प्रशासनाकडून आवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात येते. याच या कारवाईपासून वाचण्यासाठी वाळूमाफियांनी वाळू चोरी करण्यासाठी गाढवांचा वापर करताना दिसतात पोलीस प्रशासनाकडून तीन ठिकाणाहून ३६ गाढवे वाळू वाहून नेताना पकडले होते त्याच गाढवांची आता तमिळनाडू राज्यातील कोटी या प्रसिद्ध होण्याच्या ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे.

(Advertise)

पोलीस प्रशासनाकडून तीन ठिकाणी गाढवांवर कारवाई

पंढरपूर शहरातील सरडा भवन येथे भीमा नदीपात्रातून ाळू उपसा करणार्‍या अकरा गाढवांवर तर जुना अकलूज रोड जॅकवेल जवळील नदीच्या पात्रातून सुमारे १८ गाढवांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच बरोबर खडकी देवीच्या मंदिरातून वाळू उपसा करून वाहून घेणाऱ्या सात गाढवंवरती लादून घेऊन जाताना दिसून आले, असे एकूण ३६ गाढव पंढरपूर शहर पोलीस ठाण्यांमध्ये आणण्यात आले होते. या गाढवांचा मालकांचा कोणत्याही प्रकारचा तपास पोलिसांना न लागल्यामुळे या गाढवांची उटी येथे रवानगी करण्यात आली आहे.

प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार गाढवांची रवानगी

पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात पंढरपूर प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार गाढव प्राण्यांना पुढील योग्य त्या सुरक्षिततेच्याकामी इंडिया प्रोजेक्ट फॉर अनिमल इंडिया प्रोजेक्ट फॉर अनिमल ॲण्ड नेचर संस्था, निलगिरी, उटी कडे रवाना करण्यात आली आहेत. गाढव प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंढवाडा नाही.  त्या गाढवांना चार दिवस चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते. तसेच गाढवे पळून जाऊ नये, यासाठी २ होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून या ३६ गाढवांना सकाळी वाहनांमध्ये बसून उटीच्या दिशेने रवानगी करण्यात आली

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ. सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, पोना. गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, पोकॉ सिध्दनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनिल बनसोडे यांनी केली.