मुंबई महापालिका कॉंग्रेसने स्वबळार लढवावीमुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचे मत


मुंबई/प्रतिनिधी:

 मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ आमदार भाई जगताप यांच्या गळ्यात पडली आहे. त्यानंतर भाई जगताप यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असे मत व्यक्त केले आहे. पुणे भेटीदरम्यान जगताप पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी, त्यांनी आपले मत व्यक्त केले.

(Advertise)

यावेळी भाई जगताप म्हणाले की, मुंबई महापालिकेत एक वेळ होती ज्यावेळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र मागील १० वर्षांमध्ये ही संख्या ३० ते ३५ वर आली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी कॉंग्रेस पूर्ण ताकदीने लढेल, असे भाई जगताप म्हणाले आहे. भाई जगताप यांनी आज चंपाषष्ठीनिमीत्त जेजुरी येथील खंडेरायाचं दर्शन घेतले.

(Advertise)

जगताप पुढे म्हणाले की, पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्दतीने पार पाडेल.महापालिका निवडणुकांसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन लढणार आहे, असे जगताप म्हणाले.

Post a Comment

0 Comments