बार्शी! चक्क कोर्टाच्या परिसरातून वकिलाची दुचाकी लंपास


बार्शी/प्रतिनिधी:

 बार्शी तालुक्याला झालंय काय? आत्महत्या व चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा प्रत्यय आज बार्शीत चोरट्याने न्यायालयाच्या आवारातून चक्क वकिलाचीच दुचाकी चोरली आहे. या प्रकरणी ऍड.अभिजित जालिंदर जगताप (वय २३,रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादीत दिली आहे.

(Advertise)

ऍड.जगताप यांनी न्यायालयाच्या आवारात सकाळी दुचाकी (एच.एफ. डीलक्स-एम.एच.१३ डीबी १६७४) लावली होती. ते कामानिमित्ताने न्यायालयात गेले. १२.३० वा. परत आले. तेथे दुचाकी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बार्शी शहरासह इतर ठिकाणीशोध घेतला. परंतु गाडी मिळून आली नाही. तपास हवालदार रूपेश शेलार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments