शेतकऱ्यांनी राजधानीत गेल्या दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन केलं आहे. सरकार कोणताही प्रतिसाद देत नाही, तर दुसरीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाससेवक अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया देताना केंद्रावर निशाणा साधला. ज्या देशात सरकार लेखी वचन देते व ते वचन पाळत नाही, अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ‘सामना’ ने वृत्त दिलं आहे.
आयुष्यातील शेवटचं उपोषण आपण दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं होतं. त्यानंतर विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे शिष्टमंडळांने अण्णांच्या घरी जात त्यांची भेट घेतली.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी आपण दिल्लीत न जाण्याची भाजपची विनंती अण्णांनी धुडकावून लावली.
0 Comments