"मोदी सरकारने संसदेची नवी इमारत बांधण्याचा घातला घाट" १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन


अयोध्येत राम मंदिरापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीच्या नव्या मंदिराचीही उभारणी सुरु होत आहे. याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० डिसेंबरला होणार आहे. या भूमीपूजनला विरोधी पक्षातील काही मंत्र्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

(Advertise)

देशाच्या स्वातंत्र्याला २०२२ ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या आधी हे काम पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. गुजरातच्या एचसीपी डिझाईननं याचा आराखडा बनवला आहे. 
(Advertise)

तर टाटा प्रोजेक्ट याचं बांधकाम करणार आहे. संसदेच्या या नव्या इमारतीला ४ मजले, ६ प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे १ हजार, तर राज्यसभेचे साधारण ४०० खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे.

Post a Comment

0 Comments