मंगळवेढा/प्रतिनिधी :
येथील एका शिक्षकाच्या घरातून चोरट्यांनी ४८ हजाराचा ऐवज लंपास केला. लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले असल्याचे पाहून चोरी केली. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास बनशंकरी कॉलनीत ही घटना घडल्याचे उघडकीस आले.
यातील फिर्यादी रामचंद्र सेवू राठोड (वय ४५,रा बनशंकरी कॉलनी) हे प्राथमिक शिक्षक आहेत. ते सहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुतण्याच्या लग्नासाठी घराला कुलूप लावून मंगळवेढा तालुक्यातीलच बालाजीनगरला गेले होते.
ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, आणि लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १८ हजारांचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, ३० हजारांची रोकड असा एकूण ४८ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments