" एशियन ऑफ द ईयर" पुरस्कार सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला जाहिर



जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांची ‘एशियन ऑफ दी इयर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. द स्ट्रेट्स टाईम्स ऑफ सिंगापूरने अदार पूनावालासह सहा जणांना एशियन ऑफ द इयर सन्मानासाठी निवडले आहे. 

(Advertise)

कोरोना विरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा उचलल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

(Advertise)

सिंगापूर येथील ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वर्तमानपत्राकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी आशियातील सहा व्यक्तींची निवड झाली आहे.त्यात आदर पुनावाला यांच्यासह चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि चीनचे संशोधक झँग योंगझेन, सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग, दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांचा देखील समावेश करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments