काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्टारकिडचा समावेश होत आहे. रूपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामळे तो वडिलांप्रमाणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
आपल्या वडिलांच्या बॅनर खाली नाही तर यशराज फिल्मद्वारे साकारण्यात येणाऱ्या चित्रपटात आपलं नशीब आजमावणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटासाठी अभिनेत्री शालिनी पांडेची निवड करण्यात आली आहे. दरम्यान शालिनी आधिक तिच्या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती अभिनेता रणवीर सिंगसोबत 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शालिनी यशराज फिल्म बॅनर खाली तयार होणाऱ्या ३ चित्रपाटांमध्ये झळकणार आहे. त्यापैकी दिसऱ्या चित्रपटात जुनैद आणि शालिनी एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
0 Comments