भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत, शरद पवार याबद्दल निर्णय घेतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दररोज होत असलेल्या नवनवीन दाव्यामुळे राजकीय तर्कवितर्क तोंड फुटत आहे.

अनेक आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील मात्र कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपाचे १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी हे नवं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपाचे काही नेते, आमदार फुटणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.