पुणे/प्रतिनिधी:
प्रभागातील तलावात खूपच जलपर्णी झाली होती,
वारंवार तक्रार करूनही त्याकडे पुणे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत होते.
जलपर्णी वाढण्याचे कारण होते या तलावात येणारे ड्रेनेजचे पाणी,ते बंद करत नाही म्हणून शेवटी,नगरसेवक वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर संपूर्ण आंगालाच जलपर्णी गुंडाळून सभागृहात प्रवेश केला.
तेव्हा कुठे आता ड्रेनेज लाईनचे काम चालू झाले. हा वेगळा प्रयोग केल्याने त्याच्या प्रभागातील कामाला सुरुवात झाली.
यापूर्वी कोरोना रुग्णांना रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांनी कार्यकारी अभियंत्याची गाडी फोडली होती. त्यावेळी तीव्र संताप वक्त केला होता. “आम्ही माणूस आहोत, कोरोना भयाण परिस्थितीत माणसांना जगवा. उपाययोजना द्या रे बाबांनो, हात जोडून खूप वेळा सांगितले. लोकप्रतिनिधी असून न्याय देऊ शकत नसू, तर आम्ही नालायक असू” अशा शब्दात त्यांनी हतबलता व्यक्त केली.
0 Comments