सोलापूर ग्रामीणची कामगिरी ! राष्ट्रीय महामार्गावर ट्रकसह माल पळविणारी टोळी मधील ५ आरोपी जेरबंद


स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी ….
राष्टीय महामार्गावर ट्रकसह माल पळविणारी टोळी मधील ५  आरोपी जेरबंद, ४ दिवसात दरोडा उघडकीस, १०० टक्के मुद्देमाल हस्तगत,त्यांचेकडून चोरलेला ४७५ पोती कांदा, १२ चाकी ट्रक, इनोव्हा कारसह एकूण ४३ लाख ८२ हजार रू. चा मुद्देमाल हस्तगत

दिनांक १ ९ / १२ / २०२० रोजी . रात्रि ट्रक चालक तयब लतीब फुलारी हा १२ चाकी ट्रक मधून २५ टन कांदा लोड करून श्रीरामपूर जि . अहमदनगर येथून घेवून ते परतीपाडू विशाखा पट्टनम येथे पोच करण्यासाठी घेवून सोलापूर हैद्राबाद जाणा – या रोडवर बोरामणी गांवचे पुढे जात असताना अचानक एक विना नंबरची सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार ट्रकला ओव्हरटेक करून , ट्रकला कार आडवी लावून कारमधून पाच पैकी चार इसम खाली उतरून चालक व क्लिनरला शिविगाळ करून त्या दोघांना ट्रक मधून खाली ओढून लाथाबुक्याने मारहाण करून , त्यांचे ताब्यातील कांदयाने भरलेले ट्रक जबरदस्तीने दरोडा टाकून घेवून गेले म्हणून तयब लतीब फुलारी याने फिर्याद दिले वरून सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे . राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दरोडयाचे गांभीर्य ओळखून मा.पोलीस अधीक्षक श्रीमती . तेजस्वी सातपुते व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री . सर्जेराव पाटील यांना सदरचा दरोडा उघडकीस आणणेबाबत विशेष पथक तयार करणेबाबत आदेशित केले होते. 

त्याप्रमाणे सपोनि शाम बुवा व कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले होते . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा करणारे गुन्हेगार हे सोलापूर शहरातील रामवाडी व रविवार पेठ सोलापूर येथील असून त्यांनी सदरचा गुन्हा करण्यासाठी त्यांचेकडील सिल्व्हर रंगाची इनोवा कारचा वापर करून गुन्हा केला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली . त्यावरून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील सहा .पोलीस निरीक्षक शाम बुवा यांचे पथकास कारवाई करणेकामी आदेशित केले होते . 

त्यानुसार सपोनि बुवा व त्यांचे पथकाने रामवाडी व रविवार पेठ भागातून पाच संशयित इसमांना इनोव्हा कारसह ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले . गुन्हयातील ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांकडून गुन्हयात चोरीस गेलेला एकूण ४७५ पोती कांदा , चोरलेला १२ चाकी ट्रक , गुन्हा करण्यासाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार व त्यांचे वापरते मोबाईल असा एकूण ४३ लाख ८२ हजार रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . सदर आरोपीतापैकी काही आरोपीतांवर सोलापूर शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत . सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , मा.अपर पोलीस अधीक्षक श्री . अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा . पोलीस निरीक्षक शाम बुवा , सहा.पो.उपनिरीक्षक खाजा मुजावर , पो हवा.नारायण गोलेकर , धनाजी गाडे , मोहन मनसावाले , पोकॉ / अक्षय दळवी , धनराज गायकवाड , रवि हाटकिळे , अन्वर अत्तार , चालक राहुल सुरवसे , राजेंद्र गव्हेकर यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments