माढा! अनैतिक संबंधात मधील येणाऱ्या मुलाचा प्रियकराच्या साह्याने जन्मदात्या आईनेच केला खून, माढा तालुक्यातील घटना


माढा/प्रतिनिधी:

माढा तालुक्यातील परिते वाडी येथे बावीस वर्षे युवक तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता टेंभुर्णी पोलिसांनी याबाबत जलद चक्रे फिरवून गुन्ह्याचा छडा लावला आहे आईच्या अनैतिक संबंध अडचण ठरणाऱ्या युवकाचा आईने प्रियकराच्या मदतीने काटा काढला मुलाच्या खुना बाबत टेंभुर्णी पोलिसांनी जन्मदात्या आईला ताब्यात घेतली आहे व आईचा प्रियकर फरार आहे माळा न्यायालयाने आईला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुक्ताबाई सुभाष जाधव (वय. २४.परितेवाडी ता.माढा) असे मुलाच्या खुनप्रकरणी अटक आईचे नाव आहे तर सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय २२ वर्ष रा परितेवाडी) असे अनैतिक संबंध मध्ये अडचण असणाऱ्या युवकाचे नाव आहे तर तात्यासाहेब कदम असे फरार असलेला दुसरा आरोपीचे नाव असून. परितेवाडी येथील सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय २२) याचा खून करून प्रेत परितेवाडी हद्दीतील माळावर टाकले होते. पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुलाच्या आईस ताब्यात घेऊन चौकशी चालू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. 



 २४ डिसेंबर रोजी परितेवाडी शिवारातील सारी मध्ये तीक्ष्ण हत्याराच्या साह्याने एका युवकाचा डोक्यामध्ये जखम करून हत्या केली होती त्या युवकाचा मृतदेह सारी मध्ये फेकून देण्यात आला होता वडील गावातील काही युवक माळावर चारीत गेले असता तिथे त्यांना त्या युवकाचा मृतदेह आढळून आला या युवकांनी परितेवाडी गावचे पोलीस पाटील हरळी यांच्याशी संपर्क करून माहिती दिली होती आणि चौकशी केली असता हा मृतदेह सिद्धेश्वर जाधव यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर हराळे यांनी याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली होती.



करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि अमित शितोळे यांनी गुप्त महितीगाराकडून खुनाची माहिती घेतली तसेच मयताच्या लहान भाऊ बालाजी यांच्याकडून माहिती घेतली असता मुक्ताबाई हिचे शेजारील तात्या कदम याच्याबरोबर अनैतिक संबंध होते.यामुळे मयत सिद्धेश्वर हा विरोध करीत होता.तसेच तात्या कदम यास जमीन लिहून देण्यास ही सिद्धेश्वर याचा विरोध होता.यामुळे आई मुक्ताबाई हिनेच सिद्धेश्वर यास मारले असावे असा संशय व्यक्त केला. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्ताबाई हिच्याकडे तपासणी केली असता प्रथमदर्शी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांचा धाक दाखवतात मुक्ताबाई हिने खुनाची कबुली दिली याबाबत दुसरा आरोपी तात्यासाहेब कदम हा फरार असल्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही. तो या दोघांच्या संबंधात अडसर ठरू लागल्यानेच त्याचा काढला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती सपोनि शितोळे यांनी दिली आहे.

या घटनेतील आरोपी मुक्ताबाई जाधव व तात्या कदम हे शेतात जवळजवळ राहत होते.यामुळे पाच-सहा वर्षांपासून तात्या कदम याने त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाल्यानंतर त्याची बायको-मुले यांना घरातून हाकलून दिले होते व मुक्ताबाई हिस घरात नेऊन ठेवले होते.दोन वर्षांपूर्वी मुक्ताबाईचा पती सुभाष जाधव हा अचानक गायब झाला आहे.तसेच मुक्ताबाई हिची एक एकर जमीन कदम याने लिहून घेतली असून एक वर्षांपूर्वी मुक्ताबाई हीला रानात पत्र्याचे शेड मारून तेथे तिला ठेवले होते. त्यामुळे सिद्धेश्वर जाधव हा विरोध करत होता त्याचा विरोध संपवण्यासाठी मुक्ताबाई जाधव व तिचा प्रियकर तात्यासाहेब कदम यांनी सिद्धेश्वर जाधवचा खुन केल्याची प्राथमिक दर्श दिसून येत आहे.

Post a Comment

1 Comments