“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”


 खरे नक्षलवादी आहेत त्यांना पकडलंच पाहिजे, शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मग आता राज्य सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज्य सरकारला केला आहे.

 पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावर्षी कोरोनामुळे भीमा-कोरेगावला येऊ नका. घरातच सर्वांनी प्रार्थना करावी. एक जानेवारील मी  सकाळी अकरा वाजता तिथे जाऊन अभिवादन करणार असल्याचं आठवले म्हणाले.

दरम्यान, आठवलेंनी केलेल्या मागणीवर सरकार काय प्रतिक्रिया येते आणि संभाजी भिडे यावर काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments