होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्या संदर्भात सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन
सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रमुख मुद्दा म्हणजे होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा त्वरित सुरू होण्यासाठी सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. माझे सदर प्रकरणावर लक्ष असून मला ह्या संदर्भात सर्व माहिती आहे असे पालकमंत्री यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्या संदर्भात काय निर्णय घेणार ह्यावर सोलापूर डेव्हलपमेंट फोरमसहित सर्व सोलापूरकरांचे लक्ष असणार आहे. सोलापूरात लवकर विमानसेवा सुरू व्हावी ह्या करिता गेल्या तीन महिन्यांपासून सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या विषयासंबंधीत सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह चर्चा करुन निवेदने दिली आहे.
होटगी रोड विमानतळावरून तत्काल विमानसेवा सुरू करण्याचे निवेदन पालकमंत्री यांना देण्यात आले, ह्यावेळी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव, उद्योजक श्री.केतनभाई शहा, वेकअप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष अभियंता मिलिंद भोसले, आनंद पाटील, अॅड प्रमोद शहा उपस्थित होते.
0 Comments