ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले यांना कोरोनाची लागण


बार्शी/प्रतिनिधी:

ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची दिसत असल्याने कोरोना टेस्ट करून घेतल्याने रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती रणजितसिंह डिसले यांनी दिली. डिसले यांनी याबाबत स्वतःच्या मोबाईल स्टेटस वरून ही माहिती दिली. 

(Advertise)

मुंबईहून गावी आल्यानंतर रणजितसिंह द यांना लक्षणे दिसून जाणू लागल्यामुळे त्यांनी करुणा टेस्ट केल्यानंतर  पॉझिटिव्ह आली आहे. यांच्यासह त्यांची पत्नी या पॉझिटिव्ह आहेत. बाकीच्या घरातील सर्व मंडळींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
 
(Advertise)

तब्बल ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. या अभिनंदन वरच्या वर्षावात डिसले गुरुजींचा नागरिकांची थेट संबंध आला आहे त्यात राज्य जिल्ह्यातील विविध संघटना राजकीय नेते यांनीही ही त्यांचा सत्कार करण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,.मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी अभिनंदन करताना त्यांच्याशी चर्चा केली होती.

Post a Comment

0 Comments