पंढरपूर! निवृती महाराज वक्ते बाबा यांचे निधन



पंढरपूर/प्रतिनिधी:

वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य निवृती महाराज वक्ते बाबा यांचं उपचाराअंती आज त्यांची अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ८९वर्षांच्या होते. राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा  २०१६-१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना देण्यात आला होता.

भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३४ रोजी बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. अवघ्या ९ व्या वर्षापासून त्यांनी कुटुंबियांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरू केली. बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण केले होते. १९९४ ते १९५८ या काळात त्यांनी साखरे महाराज मठात गुरू निलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले. थोर पंडित संत महात्मे, ह.भ.प.परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर या संताच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथाचा पंढरपूर येथे अभ्यास केला. चार्तुमासामध्ये ६० वर्षांपासून त्यांचे अध्ययन व अध्यापनाचे कार्य चालू आहे.

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६-१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना सन्मान करण्यात आला. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.


विठ्ठल कवच, विठ्ठल सहस्त्रणाम, विठ्ठल स्तवराजʼ, ʻविठ्ठल अष्टोत्तरनामʼ, ʻविठ्ठल हृदयʼ, ʻमुक्ताबाई चरित्रʼ, ʻज्ञानेश्वर दिग्विजयʼ, ʻवाल्मिकी रामायणʼ, ʻसंत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमनʼ अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. ह.भ.प.वक्ते यांची कीर्तन, प्रवचनाव्दारे मानवतावादी सेवा अखंड सुरू असून त्यांच्या मागदर्शनाखाली हजारो साधक शास्त्राचा अभ्यास करुन राष्ट्र जिर्णोद्धाराचे कार्य करत आहेत.

Post a Comment

0 Comments