संभाजीनगर येथे विश्व मराठा संघाच्या वतीने समाजभान राखत रक्तदान शिबिर


औरंगाबाद/प्रतिनिधी:

आज विश्व मराठा संघ छ.संभाजीनगर आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिर सुरुवात, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून झाली, यावेळी ५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले व आरोग्यमंत्री माननीय श्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
     
 व्यासपीठावर उपस्थित विश्व मराठा संघाचे  संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पाटील, प्रदेशाध्यक्ष  प्रशांत दादा भोसले, महिला प्रदेशाध्यक्ष छाया ताई भगत,  पुणे शहर अध्यक्ष विद्यां ताई, पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत तांगडे पाटील दादा, छ. संभाजीनगरच्या राधा सुभाष लाटे पाटील, युवती जिल्हाध्यक्ष संभाजीनगर, विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य, समाधान दादा शिंदे पाटील युवक जिल्हाध्यक्ष संभाजीनगर, विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा सरचिटणीस संदीप दादा जाधव, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शुभम दादा दाभाडे, जिल्हा संघटक राहुल दादा विटेकर, युवती तालुकाध्यक्ष सोयगाव सोनाली ताई सोनवणे,  युवती तालुकाध्यक्ष कन्नड दिपाली ताई जाधव, माऊली मोहिते, शंकर भागडे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments