प्रा.डॉ.प्रभाकर तानाजी माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठाची प्रा.ज्ञानराजा चिघळीकर यांनी अर्थशास्त्र विषयातील( मानव्यशास्त्र) पीएच.डी.पदवी संपादन केली. त्यांनी पीएच.डी.साठी "कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती: एक चिकित्सक अभ्यास"या शीर्षकाखाली ही पदवी संपादन केली.यासाठी प्रा.डॉ.एल.एच.पाटील, अर्थशास्त्र संशोधन केंद्र ,शिवाजी महाविद्यालय, उदगीर,जिल्हा लातूर हे मार्गदर्शक म्हणून लाभले.प्रा. ज्ञानराजा चिघळीकर हे सध्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे कार्यरत असून त्यांना या कामी प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश चव्हाण व संस्थेचे अध्यक्ष राजनदादा पेडणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कोव्हिड -१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाइन ओपन डिफेन्स आयोजित केला होता. हा ओपन डिफेन्स सांगोपांग पद्धतीने संशोधनात्मक चर्चा घडवून आणणारा होता. या पार्श्वभूमीवर प्रा.चिघळीकर यांनी या विषयात केलेलं काम संशोधनात्मक पातळीवर कौतुकास्पद आहे. त्यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीचा लाभ समाजासाठी निश्चितच होईलच अशी अपेक्षा आहे. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रुपाली चिघळीकर व कुटुंबियांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला.त्यांच्या या पीएच.डी. पदवी संपादणुकीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments