बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हा


मंगळवेढा/प्रतिनिधी :

तालुक्यातील मुढवी गावच्या शिवारातील माण नदीत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्यांनी अंदाजे १ लाख ५३ हजाराचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणाची फिर्याद पो.काॅ सोमनाथ माने यांनी दिली. 
(Advertise)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर बामणे (वय ३३) व विकास नागणे (वय ३९) हे दोघे (रा.चोखामेळा नगर)येथील त्यांच्या मालकीच्या महिद्रा कंपनीचा जीतो माॅडेलचा पिकअप (क्र. एम एच ४२ एम ८२६४) कि.दीड लाख मधून तीन हजार किंमतीची अर्धा ब्रास वाळू माण नदीतून बेकायदेशीर रित्या विना परवाना मुढवी ते दामाजी कारखाना रोड वर वाळू वाहतूक  करताना मध्यरात्री एक वा. आढळून आले.

Post a Comment

0 Comments