सर्वात मोठ्या मद्यनिर्मिती कंपनीच्या सीईओ पदी पहिल्यांदाच महिला विराजमान!


हिना नागराजन यांची भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 आनंद कृपालू हे सध्या या पदावर कार्यरत आहेत. आता हिना नागराजन या आनंद कृपालू यांची जागा घेणार आहेत. सध्या USL ची मूळ कंपनी डियाजिओमध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून हिना नागराजन या कार्यरत आहे. 

 त्यांनी डियाजिओमध्ये पद सांभाळण्यापूर्वी नेस्ले इंडिया, मॅरीके या कंपन्यांमध्येही व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळली आहे.  त्या २०१८ मध्ये डियाजिओमध्ये रूजू झाल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी आपएमचे नेतृत्व केले.

Post a Comment

0 Comments