'कृषी कायद्याला पाठींबा देणारेच खरे देशभक्त' -कंगना राणावत


 बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच आपल्या टि्वट आणि वक्तव्यांवरून चर्चेत असते. अनेकदा ती आपल्या वक्तव्यांमुळे टीकेची धनी होते. परंतु, कंगना आपली मत विविध माध्यमातून बिनधास्तपणे मांडत असते. आता कंगनाने एक टि्वट करून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावर भाष्य केले आहे.

(Advertise)

कंगना आपल्या टि्वटमध्ये म्हणते, 'अखंड भारतावर प्रेम करणारे, भारत देशाचे तुकडे होऊ नयेत असे वाटणारे…अशा लोकांना सुप्रभात! कृषी कायदा समजून घेणारे आणि या कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत. त्यामुळे फसवणूकीपासून सावध रहा.',

(Advertise)

कंगनाने कृषी कायद्याला पाठींबा देणाऱ्यांनाच खरे देशभक्त म्हटले आहे, त्यामुळे आता पुन्हा कंगना ट्रोल होण्याची शक्यता आहे. कंगनाच्या टि्वट वर अनेकांनी टीका केली आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागील ३ ते ४ आठवड्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यावर अनेक चर्चा, बैठका झाल्या, मात्र काहीच तोडगा निघाला नाही. आता केंद्र सरकार काय भूमिका घेतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments