मुंबई :
ठाकरे सरकारने आरे येथील कारशेडचे काम बंद करून मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णय घेतला होता. या ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे, ठाकरे सरकारवर भाजपने सडकून टीका करत आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टि्वटकरून ठाकरे सरकारव हल्लाबोल केला आहे. तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार, असा शब्दांत अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
सौनिक समितीतील सदस्यांनी मुंबई आणि उपनगरांत सर्व ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर एक अहवाल सादर केला. त्या अहवालात मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेव्यतिरिक्त दुसरा चपखल बसणारा पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. काही ठिकाणे पर्यावरणाच्या दृष्टीने न चालणारी तर काही ठिकाणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असल्यामुळे आरेइतकी उत्तम जागा मुंबईत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
या मुद्द्यावर ट्विट करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी टि्वटमध्ये म्हंटले आहे की, "आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल… तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार…" अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
0 Comments