मानसी नाईकच्या लग्नाचं काउंटडाउन सुरू


गेले अनेक दिवस अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. 

मानसीने तिच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली दिली होती, त्यानंतर दोघांनी साखरपुडासुद्धा केला. आता मानसीच्या लग्नाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.

तिच्या खास मैत्रिणींनी तिच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते.

 या बॅचलर पार्टीचे काही फोटो मानसीने सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि म्हटले की, मी माझ्या बहिणींशिवाय मिस्टरांसोबत लग्न करू शकत नाही. 

जवळचे फ्रेंड्स आयुष्यातील खरा खजिना आहे.  या हाऊस पार्टीमध्ये मानसीने स्पेशल आणि ट्रेंडी केकसुद्धा कापला.

Post a Comment

0 Comments