स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.
शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका यावेळी राजू शेट्टी यांनी मांडली.
आता चर्चेच्या फेऱ्या थांबवून ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं. याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचं कौतुक केलं. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन कसं करायचं हे शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे, असं ते म्हणाले.
0 Comments