आमच्याकडे १७१आमदार, सरकार दमदारपणे काम करतंय 'एकनाथ शिंदे यांनी फेटाळला नारायण राणेंचा दावा


मुंबई /प्रतिनिधी:

ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार, असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला. त्यांचा हा दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावलाय. आमच्याकडे १७१ आमदार असून आमचे सरकार दमदारपणे काम करत आहे. मागेही मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचे भाकित करण्यात आले होते. परंतु या सरकारने यशस्वीपणे वर्षपूर्ती पूर्ण केली आहे, सरकारला कोणताही धोका नाही, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.  

यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिशी संवाद साधताना राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले. सरकार पडेल म्हणून काही लोक पहिल्या दिवसापासून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आमच्याकडे १७१ आमदार आहेत. सरकारला काहीही धोका नाही. गेल्यावर्षी मार्चमध्येही सरकार पडण्याचे भाकित करण्यात आले होते. त्यानंतरही आम्ही दमदारपणे काम करत आहोत, हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

________________________________________
श्री हालमत सांप्रदाय मंडळाची २०२१ ची दिनदर्शिका माफक दरात उपलब्ध.....
किंमत फक्त ३० रुपये
संपर्क : ७३८७७१२५२५/९७३००३२७२४
_________________________________________



शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेली ईडीची नोटीस ही दुर्देवी बाब आहे. सुडाचे राजकारण कोणीही करू नये, द्वेषाचे हे राजकारण दीर्घकाळ टिकत नसते, असे त्यांनी सांगितले. लोकशाहीत निवडणुका होत असतात. त्यात कोणी जिंकतो तर कोणी पराभूत होत असतो. भाजपला लोकांनी विरोधात बसवले असून महाविकास आघाडी लोकहिताचे काम करत असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत, संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत. केंद्राने दोन पावले मागे यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केलेय.

Post a Comment

0 Comments