सोलापुर/प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर २०२० रोजी जाहीर केला आहे. यानुसार या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींपैकी राज्यातील १६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद अथवा नगरपंचायती मध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी असे राज्य शासनाकडून निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज, महाळुंग व नातेपुते या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगर पंचायती मध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या जाहीर करण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुका घेऊ नयेत असे महाराष्ट्र शासनाने निवडणूक आयोगाला कळवले आहे. राज्य शासनाचे उपसचिव एस. जे. मोघे यांनी १६ डिसेंबरला निवडणूक आयोगाला यासंदर्भात लेखी कळवले आहे.
निवडणुका पुढे ढकलण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, महाळुंग -श्रीपुर, नातेपुते आणि वैराग या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा १९ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आले असून अक्षेप मागवण्यात आले होते. हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे.
0 Comments