सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावात पहिला रेशीम लागवड ड्रॅगन फ्रुटचा प्रयोग


 
शेंद्री/प्रतिनिधी:

बार्शी शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर शेंद्री गाव आहे. सिद्धेश्वर नेंदाणे याची वडिलोपार्जति शेती आहे परिस्थिती गरिबीची असताना  कामा निमित्ताने पिंपरी चिंचवड , भोसरी येथे वास्तव्यास होते एक मोठ्या राजकिय वक्तिकडे बारा वर्षे नोकरी करीत होते कोरोना लॉकडाऊन च्या काळामध्ये गावी आले नंतर वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देऊन नवीन काही तरी करण्याचे ठरवले त्यांनी त्यांच्या आपल्या हिमतीच्या जोरावर रेशीम उद्योगातून दीड एकरात वर्षांला चार लाख रुपये कमावण्याचा मानस आहे . दिड एकर तुती आणि २३×६० च्या पत्र्याचा शेड यावर सुरू केलेल्या या व्यवसायाने आज त्याला समृद्धी दिली आहे. नोकरीची आस धरलेल्या व शासनाच्या मदतीवर्ती अवलंबून राहणाऱ्या  तरुणांना त्याने आपल्या कृतीतून एक चांगला संदेश दिला आहे.
रेशीम किडय़ापासून केवळ २१ दिवसांत रेशीम कोष तयार होण्याच्या कालावधीत दिवसातून दोन चार तास काम करायचे. महिन्याकाठी ३५ ते ४० हजार रुपये हा उद्योग मिळवून देतो. अत्यंत कमी भांडवलातला हा उद्योग सेंद्रिय शेती उद्योगही आहे. या शेतीला औषध किंवा रासायनिक खतांची आवश्यकता नाही. त्यामुळे पर्यावरणासही काही धोका नाही. कच्चा माल तुती व रेशमी किडय़ांचे अंडे उपलब्ध होण्यास फारशी अडचण नाही रेशीम उद्योग साठी  सरकारी अनुदान ही आहे पण ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल उस्मानाबाद,सांगली, कोल्हापूर, बीड, सोलापूर, सातारा या भागातील शेतकऱ्यांना कर्नाटकात व्यापार केंद्रे उपलब्ध आहेत. चांगला भाव मिळत असल्याने आर्थिक फटका बसण्याचा धोका नाही. रेशीम उद्योगामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात भरभराट झाली आहे.
आज शेतामध्ये , जुलै मध्ये ड्रॅगन फ्रुट ची ६०० पोल च्या साह्याने २४०० रोपे लावली आहेत  पहिल्या वर्षी अंदाजे १२ टन उत्पादन निघेल त्यातून सरासरी पाच लाख उत्पन्न मिळेल त्याचे फळ मार्च अखेरीस बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहेत आज बाजारात ड्रॅगन फ्रुट ला ३५० रुपये किलो चा भाव आहे  पालेभाज्या , कोबी , भेंडी , बटाटा , कलिंगड सारखी पिके घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्यावरी भर आहे.

_________________________________________
(Advertise)
__________________________________________

Post a Comment

0 Comments