एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन


मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज दु:खद निधन झालं आहे. धर्मपाल गुलाटी यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं आहे.  गुलाटी यांच्यावर मागील तीन आठवड्यांपासून दिल्लीतील रुग्णालयात उपाचर सुरु होते.

(Advertise)

आयआयएफएल हुरून इंडिया रिच २०२० च्या यादीत सामील असलेले ते सर्वात वयस्कर भारतीय श्रीमंत व्यक्ती होते.

(Advertise)

धर्मपाल गुलाटी यांचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा होता. एमडीएचहा मसाल्यांच्या सर्वात मोठ्या ब्रॅन्डपैकी एक आहे. तसंच त्यांच्या कंपनीत ५० निरनिराळ्या मसाल्यांचं उत्पादन केलं जातं. एमडीएचचं आज केवळ भारतातच नाही तर दुबई आणि लंडनमध्येही कार्यालयं आहेत.

दरम्यान, गुलाटी यांना यापूर्वी पद्मभूषण या पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments