"महाविकास आघाडी सरकार पहिल्या चाचणी यशस्वी झाले" - गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई


पंढरपूर/प्रतिनिधी:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी  मित्र पक्षांना एकत्र घेऊन काम करत आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून  महा विकास आघाडीचे सरकार  दोन महिन्यात पडेल तीन महिन्यात पडेल असे सांगण्यात येत होते. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यावर सरकार पडेल असा दावा केला होता, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. यात विजय मिळाल्याने पहिल्या चाचणीत महविकास आघाडी यशस्वी झाल्याचे, मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
(Advertise)

पंढरपूर तालुक्यात सरकोली येथे आमदार भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

आता झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात निवडणुकीत मतदारांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारला स्वीकारले आहे. पदवीधर मतदार संघाच्या भाजपाच्या पारंपारिक जागेवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. मात्र स्वतः च्या पक्षात काही पडझड होऊ नये. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही पुणे पदवीधर मतदार संघ या निवडणुकीत राखता आला नाही. लोकशाही मार्गाच्या मतदान प्रक्रियेतून मतदारांनी महाविकास आघाडी सरकारला निवडले आहे. भाजपने कितीही कांगावा केला तरी हे सरकार चालणारच, यासाठी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या नेत्यांनी ही नमूद केले आहे. हे महा विकास आघाडीचे सरकार भक्कमपणे चालणारचा असा विश्वास शंभूराजे देसाई यांनी केला.
(Advertise)

चंद्रभागा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे, तसेच वाळू माफिया बरोबर पोलिस कर्मचार्‍यांचा सहभाग असणाऱ्या अनेक तक्रारी आहेत. पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे त्यांच्याशी बैठक घेऊन याविषयी लवकरच चर्चा करून वाळू चोरी थांबविण्याचा प्रयत्न करू यामध्ये पोलीस प्रशासनाचा कोणताही कर्मचारी दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा शंभूराजे देसाई यांनी दिला.

Post a Comment

0 Comments