शिवसेना नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. गोव्यात काही कामा निमित्त ते गेले होते. त्यावेळी त्यांचं निधन झालं. मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज आणलं जाणार आहे.
भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबागमध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले, त्यातील मोहन रावले हे पहिल्या फळीचे शिवसैनिक होते.
मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते.
0 Comments