हुलजंती ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास ५ लाखाचे बक्षीस : अमीर आत्तार


गावच्या विकासासाठी सन उद्योग समूह व शेतकरी संघर्ष संघटनेचे आवाहन

मंगळवेढा/प्रतिनिधि : 

नुकतेच निवडणूक आयोगाने ग्रामपंचात निवडणुका जाहीर केल्या आहेत. तरी हुलजंती ग्रामपंचायतीची ही निवडणुक बिनविरोध झाल्यास सन उद्योग समूह व शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे गावच्या विकासासाठी ५ लाखचा निधी बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे या सन उद्योग समूहाचे सी.एम.डी व पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघर्ष संघटनेचे संघटक अमीर आत्तार यांनी जाहीर केले आहे.
(Advertise)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व गावाच्या विकासाचा विचार करता ही निवडणूक बिनविरोध झाल्यास तो एक युवकांसाठी नवा आदर्श ठरेल. तसेच कोरोनामुळे व मुसळधार पावसामुळे अगोदरच शेतकरी व जनतेची खुप हेळसांड झाली आहे. यामुळे गावातील ही निवडणूक बिनविरोध झाली तर शासनातर्फे जो १०लाखाचा निधी मिळतो तो गावच्या विकासासाठी उपयोगी होईल असे सर्वच युवकांतुन बोलले जात आहे.

(Advertise)

याकरिताच गावातील सर्वच पक्षतील पदाधिकऱ्यांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढल्यास  ५ लाखाचा निधी बक्षीस म्हणून देणार असल्याचे आवाहन सन उद्योग समूहाचे सी.एम.डी व पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघर्ष संघटनेचे संघटक अमीर आत्तार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments