"कोल्हापुरातील पंचगंगा स्मशान घाटाजवळ दोरीने बांधलेला मृतदेह आढळला"


पंचगंगा नदीवरील दशक्रिया विधी घाटाजवळ नदीपात्रात संशयास्पद मृतदेह  आढळून आला. अंदाजे ५० - ५५ वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून मृतदेह मासेमारी करण्याच्या दोरीने गुंडाळून काठावरील एका दगडाला बांधलेल्या स्थितीत होता. यामुळे हा खून असावा का? की आत्महत्या? अशा संशयावरून पोलिस तपास करत आहेत. तर ओळख पाठविण्याचे काम करवीर पोलिस करत आहेत. 

(Advertise)

पंचगंगा नदी घाटावर विधीसाठी आलेला लोकांना नदीपात्रात संशयास्पद मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल व लक्ष्मीपुरी पोलिस, करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. तसेच याची माहिती कळताच करवीर पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर  व करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला असून शवविच्छेदनानंतरच नक्की कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments