शिर्डी संस्थानने साई दर्शनासाठी भक्तांसाठी ठरविला ‘हा’ ड्रेस कोड



 शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. 

अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे. लॉकडाउननंतर मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णायाची दोन्ही बांजूनी चर्चा होत आहे. 

देशातील काही मंदिरांमध्ये असे निर्णय पूर्वीच घेण्यात आले. त्यातील काही ठिकाणी ते वादग्रस्तही ठरले होते. आता शिर्डी संस्थानने भाविकांना अशी सूचना दिली आहे. मंदिर परिसरात संस्थानने असे सूचनाफलक लावले आहेत. 

त्यावर म्हटले आहे की, ‘साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी.’ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत हे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments